इस्लामविषयी सर्वत्रच गैरसमज आहेत!
धर्मचिकित्सा ही सर्व चिकित्सेची सुरुवात असते, हा मार्क्सचा सिद्धान्त एव्हाना समजू लागला होता. पण चिकित्सा म्हणजे धार्मिक परंपरातील कालबाह्य रूढी आणि विचार किंवा मूल्यं लोकांसमोर मांडणं, हे समीकरण मला संकुचित वाटत होतं. कारण सर्वच पारंपरिक समाजाच्या इतिहासात अन्याय, शोषण, गुलामगिरी असतेच; पण त्याच बरोबर या समाजाचं मानवी संस्कृतीत काही ना काही विधायक योगदान असतं.......